दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: येथून जवळ असलेल्या सोमनाथ येथील ए.एम.डी. इंग्लिश स्कूल आणि कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ.दिलीप अर्जुने,संस्थेच्या सचिव डॉ. मंगला अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जगदीश प्रीतीयानी,सरपंच इंद्रजीत रामभाऊ कठोरे, सदाशिव भुतेकर,डॉ.जावेद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशभक्तीपर नृत्य, भाषणे आणि विविध वेशभूषा आणि सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.

मुख्याध्यापक निशांत लालझरे, ॲडमिन ज्योती बगीनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश कांबळे, विजया उबाळे यांनी नियोजन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कांबळे,  सुशील गुढेकर,अश्विनी कांबळे, प्रतिभा डेविड ,अनिता गिरी, पुष्पा राऊत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!