दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर: जिद्द, चिकाटी आणि अखंड सातत्याच्या जोरावर ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने यशाचे शिखर गाठले आहे. चांदई ठोंबरी येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थिनी समीना सय्यद हिची नाशिक जिल्हा परिषदेत पदवीधर प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांच्या अथक परिश्रमामुळे तिला हे यश मिळाले.त्याबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सध्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणे हे कठीण काम बनले आहे. परंतु समीना सय्यद हिने हार न मानता अभ्यासतील सातत्य कायम ठेवत तिने हे यश संपादन केले आहे. सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या समीनाने सिद्ध करून दाखवले आहे की, परिस्थिती कशीही असली तरी शिक्षण हेच माणसाचे जीवन बदलून टाकणारे सर्वात मोठे माध्यम आहे. तिचे हे यश ग्रामीण भागातील इतर मुलींनाही प्रेरणा देणारे आहे.

तिच्या या यशामध्ये मार्गदर्शन करणारे शिक्षक,वडील शफीक सय्यद, काका तथा सामाजिक कार्यकर्ते बिस्मिल्ला सय्यद यांचे मोठे योगदान आहे. समीना सय्यद हिच्या या उल्लेखनीय यशामुळे चांदई ठोंबरीग्रामस्थ आणि परिसरात विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!