दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर : येथील डायनामिक इंग्लिश स्कूल, खरात मामा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजनाने करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव गणेश भाऊ खरात, प्रा.बाळासाहेब बोराडे, प्राचार्य भास्कर पडोळ,राजू नागवे, निवृत्ती भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तन्वी रोकडे,भारती गायके, अमृता नागवे, कार्तिकी भोंडे,मनस्वी वीर या विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील संघर्षमय इतिहास कथन करून उपस्थितांची मने जिंकली. त्याबद्दल हरिभाऊ काळे यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविले. कल्पना ठोंबरे यांनी रझाकारांनी केलेले अत्याचार व मराठवाड्याच्या जनतेने स्वातंत्र्यासाठी दिलेला संघर्ष याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी पिंपरे तर आभार कैलास गडवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूजा पुंगळे, देवयानी क्षीरसागर, पूजा गायकवाड, शीतल इंगळे, भाग्यश्री वाघचौरे, रवीना कव्हाळे, पूजा कव्हाळे, कविता मिसाळ, लक्ष्मण राजहंस, नारायण नवले, सचिन आठवले, समाधान नागवे, विजय जाधव, निवृत्ती धसाळ, दादाराव काकडे, विकास घोरपडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!