दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर:
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे राजूर परिसरातील सोयाबीनचे पीक करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.खरीप हंगामातील उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे.त्यामुळे वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा अशी मोठी चिंता बळीराजाला सतावत आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे बियाणे, खते, फवारणी खर्च आणि वर्षभराची मेहनत वाया जाताना दिसत आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावरच बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
यावर्षी सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन पेरणी केली होती.महागडे बियाणे, खते आणि मशागतीसाठी हजारो रुपये खर्च केले. मात्र पीक ऐन बहरात असतानाच पावसाने दडी मारली.पाण्याअभावी सोयाबीन पीक करपून गेले आहे.पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.
(जालिंदर पुंगळे,शेतकरी, राजूर)
