दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथील शेतकऱ्यांचे 2022 23 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई म्हणून शासनाने अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते.परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले नसल्याने शेतकरी या लाभापासून वंचित राहिला आहे.त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे अशी मागणी राजुर येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
हसनाबाद महसूल मंडलांतर्गत राजूर येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अनुदान आद्यपीय मिळाले नाही.अजूनही ७० टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत.संबंधित अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पी.एम.किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नियमित जमा होतात परंतु अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा होत नाही याबद्दल शेतकऱ्यांनी खेद व्यक्त केला आहे.
यावर्षी शेतकऱ्यांचा घरात अजूनही कापूस पडून आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.अनुदान रक्कम मिळाल्यास खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यास मदत होऊ शकते.त्यामुळे तात्काळ अनुदानाची रक्कम खात्यात जमा करावी अन्यथा राजूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे शेतकऱ्यांनी तहसीलदारास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर विनायक पुगंळे,रामेश्वर टोम्पे,ज्ञानेश्वर पुंगळे, अंबादास पुंगळे,मीराबाई पुंगळे,प्रवीण पुंगळे,संदीप पुंगळे, शरद पुंगळे,सुरेश पुंगळे,उर्मिला डोंगरे,दुर्गेश डवले आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तात्काळ अनुदान रक्कम जमा करा; अन्यथा आंदोलन-रामेश्वर टोम्पे

यावर्षी कापसाला समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकरी शेतकरी अडचणीत सापडला आहे.अनुदान रक्कम मिळाल्यास खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यास मदत होऊ शकते.त्यामुळे तात्काळ अनुदानाची रक्कम खात्यात जमा करावी अन्यथा राजूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल .
रामेश्वर टोम्पे ,शेतकरी, राजूर
