दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या बाणेगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवत आठवीचे सहा विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले असून इयत्ता पाचवीतील कार्तिक ससाणे याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी आणि त्यांना अभ्यासात सातत्यपूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याशिष्यवृत्ती परीक्षेत आठवीतील प्रशांत उत्तम रेवगडे, प्रतीक्षा संदीप भालेराव, त्रिवेणी गजानन भालेराव, अमन नन्हेखा शेख, नंदिनी गजानन हिवाळे आणि श्रुती विठ्ठल भालेराव या सहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होण्याचा बहुमान मिळवला. तर इयत्ता पाचवीतील कार्तिक विलास ससाणे याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.
यायशाबद्दल गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, केंद्रप्रमुख श्रीकृष्ण निहाळ, रमेश पुंगळे,मुख्याध्यापक भास्कर घुगे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतापराव पडोळ, सरपंच उत्तम रेवगडे,माजी सरपंच रामेश्वर पाटील पडोळ,माजी सैनिक सर्जेराव पाटील पडोळ,चेअरमन गजानन भालेराव,सामाजिक कार्यकर्ते पंडितराव पडोळ,शिवाजीराव पडोळ, संदीप पडोळ, कृष्णा भालेराव, विठ्ठल भालेराव, संतुकराव पडोळ, विलास ससाने, रावसाहेब भालेराव,भाऊसाहेब कोठाळे, नामदेव घोलप, ग्रामपंचायत सदस्य,शालेय समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच केंद्रातील व शाळेतील शिक्षक भगवान तांबेकर,धनश्री तरके,सीमा काकडे, आत्माराम पडोळ यांच्यासह पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
