दर्पण सह्याद्री न्यूज
भोकरदन :येथील पंचायत समिती सभागृहात तालुका स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक नुकतीच संपन्न झाली.या बैठकीस महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील ,नाशिक संघटनेचे जिल्ह्या अध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डोळसे यांनी तालुक्यातून आलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ही योजना यशस्वी करण्यासाठी शासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

दुकानदारांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी,सर्व्हर समस्या,वेळेवर न मिळणारे मार्जिन अशा तक्रारी ऐकून घेत त्यावर लगेच सरकारशी बोलणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथराव थोटे यांनी जाफराबाद, अंबड,घनसावंगी या तीन तालुक्यांचे मार्जिनचे पैसे अजूनपर्यंत पडलेले नसल्याचे लक्षात आणून देताच डोळसे यांनी मंत्रालयात संपर्क साधून तालुक्यातील थकीत कमिशन दुकानदारांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मिळवले.

याबैठकीस स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथराव थोटे,तालुकाध्यक्ष विश्वासराव गाडे, तालुका सचिव कैसरसेठ,उपसचिव राजू भालेराव यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची उपस्थिती होती.
