दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर : येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.माजी सैनिक प्रकाश पुंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर सेवानिवृत्त शिक्षक दिलीप पुंगळे, प्रा.बाळासाहेब बोराडे, ग्रामसेवक प्रमोद पुंगळे,पंचायत समिती कर्मचारी कृष्णा पुंगळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते. शिक्षकांनी भाषणातून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी सरपंच भाऊसाहेब भुजंग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल पाटील पुंगळे,विश्वस्त गणेश मामा साबळे,जेष्ठ नागरिक जगन्नाथ थोटे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरामपंच पुंगळे, पोलीस पाटील भिकनराव पुंगळे,ग्राम पंचायत सदस्य परमेश्वर पुंगळे, पत्रकार शिवा बोर्डे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष योगेश पुंगळे,निवृत्ती भालेराव, विठ्ठलराव पुंगळे, व्यापारी संघ अध्यक्ष मुकेश अग्रवाल,लक्ष्मण कांबळे,पत्रकार साहेबराव पवार,केंद्रप्रमुख रमेश पुंगळे,मुख्याध्यापीका उज्वला गाडेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!