दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर: राजूर गणपती संस्थाने गणेशोत्सवात मंडळांच्या वतीने राबविण्यात आलेल्या समाजभिमुख उपक्रमाची दखल घेत त्यांना पुढील काळात प्रोत्साहन देण्यासाठी अंबड, बदनापूर,भोकरदन तालुक्यांतील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी मंचावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, भाजप नेते बद्रीनाथ पठाडे, बाळासाहेब काळे, संजय डोंगरे, पद्माकर जऱ्हाड,विलास जऱ्हाड वसंत जगताप, जितेंद्र पालकर, सुभाष बोडखे, सुभाष काटकर, कल्याणराव काळे यांच्यासह गणेश मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना श्रीक्षेत्र राजूर गणपती संस्थानची समृद्ध परंपरा,त्याद्वारे राबविण्यात येणारे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक उपक्रम आणि निष्काम सेवा देणाऱ्या सेवेकरींच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच गणपती संस्थानच्या वतीने गणेश मंडळाने राबविलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची दखल घेत गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले .याकार्यक्रमास सुरेश लहाने, नामदेव तिडके, विष्णू कोल्हे, गजानन नागवे, रामेश्वर सोनवणे,राजीव खरात, भाऊसाहेब काकडे, भगवान नागवे, भाऊसाहेब भुजंग,गणेश मामा साबळे,प्रशांत दानवे, गणपती संस्थान पदाधिकारी, सेवेकरी, तहसील,पोलीस प्रशासन प्रतिनिधी तसेच अंबड, बदनापूर, भोकरदन तालुक्यांतील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!