दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: नवरात्रोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उपासनेचा उत्सव आहे. या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश देता येईल या उद्देशाने राजूर येथून जवळ असलेल्या डोणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते,दुर्गामाता उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सर्व समाजघटकांना सामील करून भेदांच्या भिंतीला छेद देत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
डोणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते, दुर्गामाता उत्सव समिती संकल्पनेतून गावातील वेगवेगळ्या समाजातील व्यक्तींना पूजा व आरतीचा मान देण्यात आला. या उपक्रमातून सामाजिक एकोप्याची भावना दृढ होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.भेदभावास मूठमाती देऊन समाजात समानतेची भावना रुजविणे हा यामागचा उद्देश असल्याचे दुर्गामाता मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मकरंद चांदोडकर, गणेश अंभोरे,जनार्धन पुंगळे, मिलिंद जाधव,साहेबराव हिवाळे,विठ्ठल हिवाळे, गणेश घोडके, पुंजाराम अंभोरे,कृष्णा घोडके तसेच समस्त दुर्गामाता उत्सव समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला.
यांच्या हस्ते करण्यात आली पूजा व आरती
दुर्गा माता मंडळाच्या वतीने विविध समाजघटकातील बांधवांनी उत्सवात सहभाग नोंदवला.त्यामध्ये गणेश अंभोरे, जय अंभोरे,गजानन लोखंडे, फकीरचंद पिंपळे,मिलिंद जाधव या दाम्पत्याच्या वतीने सपत्नीक देवीची पूजा व महाआरती करण्यात आली. दुर्गामाता मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रतिक्रिया
धार्मिक उत्सव केवळ पूजा-अर्चापुरते मर्यादित न राहता सामाज परिवर्तनाचे माध्यम ठरले पाहिजेत.आपण सारे एक आहोत ही भावना सर्वांच्या मनात निर्माण व्हायला हवी.या उपक्रमातुन सामाजिक भेदाची दरी दूर होण्यास मदत होईल.म्हणून धार्मिक उत्सवातून सामाज परिवर्तन झाले पाहिजे.
मकरंद चांदोडकर,प्रांत संयोजक,
सामाजिक समरसता मंच
