दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर: येथील माऊली बी.ए. प्रशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालय येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात व देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शासकीय गुत्तेदार सुधाकर पाटील दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष  ज्ञानेश्र्वर पूंगळे यांनी आपल्या भाषणातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमास संस्था अध्यक्ष ज्ञानेश्र्वर पूंगळे प्राचार्या आशाताई पूंगळे तसेच प्राध्यापकवृंद उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!