दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर : येथील जी.ई.एस. एज्युकेशनल ग्रुपमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त शाळेत  शैक्षणिक ,सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकर पाटील दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी भगवानराव नागवे,पंडित पुंगळे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पुंगळे,प्राचार्या आशाताई पुंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठवाड्याच्या इतिहास, संस्कृती, परंपरा, सामाजिक व शैक्षणिक वाटचालीची माहिती देणारी भाषणे सादर केली. दीपक डवले यांनी मराठवाडा विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तू ठोंबरे, विष्णू मिसाळ,दिपक डवले,गणेश मोरे,सुरेश कासारे,सिध्दार्थ रगडे, सुधीर कातखडे, किशोर पवार,वरद पुंगळे,बालाजी शितोळे,शुभम इंगळे, अजय जाधव,कुणाल शिंदे,सुनील लष्करे,मीनाक्षी राऊत,वैशाली गिरी, मीरा गोरे ,वंदना थोटे,रिना जाधव, उषा जाधव,माधवी माने,नयना पिंपळे,अनिता उगले,स्वाती दानवे, अनिता गायकवाड,श्वेता मिस,निता डवले,समीक्षा मराठे,शिल्पा रगडे, स्वाती शेळके,पूजा बोर्डे,शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर, सतीश वराडे,बाबासाहेब जाधव,कार्तिक पुंगळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!