दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर: येथील जी.ई.एस. एज्युकेशनल ग्रुपमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती,थोर शिक्षणतज्ज्ञ,तत्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.कार्यक्रमाच्या

सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत मनोगते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

शिक्षकांचे व्यक्तिमत्व,संस्कार आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थी जीवनाची जडणघडण होते.समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे आहेअसे मत भोकरदन पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके यांनी व्यक्त केले.

यावेळी केंद्रप्रमुख श्रीकृष्ण निहाळ, रमेश पुंगळे ,माने सर ,राजू निहाळ , कणखर सर, शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे,दत्तू ठोंबरे ,विष्णू मिसाळ, दिपक डवले,गणेश मोरे,सुरेश कासारे, सिध्दार्थ रगडे,सुधीर कातखडे,किशोर पवार,वरद पुंगळे, बालाजी शितोळे,शुभम इंगळे,अजय जाधव,कुणाल शिंदे,सुनील लष्करे, मीनाक्षी राऊत ,वैशाली गिरी ,मीरा गोरे ,वंदना थोटे,रिना जाधव,उषा जाधव,माधवी माने,नयना पिंपळे, अनिता उगले,स्वाती दानवे, अनिता गायकवाड,श्वेता मिस, निता डवले, समीक्षा मराठे, शिल्पा रगडे,स्वाती शेळके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर,सतिष वराडे, बाबासाहेब जाधव, कार्तिक पुंगळे ईत्यादींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!