दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना:
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्या मार्गर्शनाखाली ‘चला शाळेत जाऊया’ हे राज्यव्यापी महाअभियान ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर दरम्यान राबवले जात असून त्याचाच एक भाग म्हणून १० ऑक्टोबर रोजी प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी शिष्टमंडळासह जिल्ह्यातील भोकरदन,जाफ्राबाद तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.

या दौऱ्यात शिक्षण उपसंचालक एकनाथ आंबोकर,डायट प्राचार्या श्रीमती देशमुख,शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, संगीता भागवत, लता सानप,डॉ.प्रकाश माण्टे,सूर्यवंशी साहेब,जोशी साहेब ,संजय कायंदे, काझी साहेब, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, मनोज कोल्हे,रवी कवडे, शिविअ वाघ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राजूर जिल्हा परिषद शाळेला दिली भेट:
‘चला शाळेत जाऊया’ या महाभियान दरम्यान प्रधान सचिव रणजितसिंह देओल,शिक्षण उपसंचालक एकनाथ आंबोकर यांनी राजूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक,माध्यमिक शाळेस भेट दिली.शाळेतील भौतिक सुविधा,परीस स्वच्छता, संगणक लॅब, संविधान कक्ष, नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन आणि अध्यापनातील प्रगती, लोकसहभाग याबाबींचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले.
हा आहे अभियानाचा मुख्य उद्देश :

या अभियानातून सरकारी शाळेतील भौतिक सुविधा,पिण्याचे शुद्ध पाणी, मुला- मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, परीस स्वच्छता,संगणक कक्ष,विद्युत व्यवस्था,संरक्षण भिंत, लोकसहभाग, सीसीटीव्ही, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प या बाबींचा आढावा घेतला.वरील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे देओल यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच भाऊसाहेब भुजंग, गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेश साबळे,ग्राम पंचायत सदस्य नामदेव पुंगळे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष भीमाआप्पा दारूवाले, विद्यमान अध्यक्ष अनिल पुंगळे तसेच पळसखेडा ठोंबरी शाळेचे अध्यक्ष भगवानराव ठोंबरे, पांडुरंग इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.अभियान यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख श्रीकृष्ण निहाळ,रमेश पुंगळे,राजू निहाळ, मुख्याध्यापिका श्रीमती गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भगवान तांबेकर यांनी केले.यावेळी संतोष काकडे, चंद्रशेखर देशमुख, संदीप देशमुख, दिलीप जंजाळ, शब्बीर शेख यांसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
