दर्पण सह्याद्री न्यूज
भोकरदन: येथील मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.५ सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्त महाविद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनीही शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरुजींना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
तसेच महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यही कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एकंदरीत भोकरदन येथील मोरेश्वर फार्मसी महाविद्यालयात शिक्षक दिन आणि दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी प्रा.संदिप साबळे, मोरेश्वर विद्यालयाचे भगवान डोंगरे,नुतन विद्यालयाचे प्राचार्य पंकजकुमार शिमरे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य सौरभ सौदार, उबाळे सर, इंगळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.गिरणारे, प्रा.पाबळे, प्रा.सरोदे, प्रा.पुंगळे, प्रा.सोनगिरीकर,प्रा.तंगे,प्रा.कोल्हे,प्रा. वानखेडे यांच्यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेयुश पठाण या विद्यार्थिनीने केले.आभारप्रदर्शन श्रीमती प्रा.शहरवाळे यांनी केले.
