दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथील तसेच बदनापूर तालुक्यातील पीएमश्री जि.प.कें. प्राथमिक शाळा चिखली येथील पदवीधर शिक्षक विनोदकुमार विक्रम पांडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत शिक्षणशास्त्र विषयातील पी.एचडी. पदवी प्राप्त झाली आहे.

पांडे यांनी ‘जालना जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेतील सहशालेय उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संपादणूकित येणाऱ्या त्रुटींचा चिकित्सक अभ्यास’या विषयावर आपले संशोधन डॉ. एन एन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केले.

सदरील संशोधनासाठी कुलगुरू डॉ व्हि एल माहेश्वरी,विद्यापीठ संशोधन विभाग, कमिटी चेअरमन डॉ. देवरे सर, बाह्य परीक्षक डॉ. चेतन चव्हाण सर,साने गुरुजी विद्या प्रबोधिनी खिरोदाचे प्राचार्या डॉ. मोरे मॅडम,डॉ.भुकन सर, डॉ.सूर्यवंशी मॅडम,डॉ.मुंडे, डॉ.रतकले मॅडमयांचे सहकार्य लाभले.

तसेच मत्स्योदरी महाविद्यालय जालनाचे प्राचार्य डॉ. वडजे सर, डॉ. भिंगोले मॅडम, डॉ. संतोष खिराडे, डॉ.संजय शिंदे, प्रा.बाळासाहेब बोराडे, डॉ ओमप्रकाश थिटे, डॉ नन्नवरे डॉ. पाचपांडे, डॉ.संतोष कोळी,डॉ. शामकांत रुले,गजानन सास्ते, जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद इत्यादींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
