दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत राजूर येथील मोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शुभम रामेश्वर टोम्पे याने दहावीच्या परीक्षेत ९२.४०% गुण मिळवून विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल मोरेश्वर विद्यालयाचे प्राचार्य संतोष सोनुने, जेष्ठ शिक्षक संतोष इंगळे,पत्रकार रामेश्वर टोम्पे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी शुभम टोम्पे याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
