दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर: येथील सामाजिक कार्यकर्ते कारभारी धोंडीबा रेवगडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत बाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे टाय,बेल्ट तसेच इतर शैक्षणिक साहित्य आणि खाऊंचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
रेवगडे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेतील मुख्याध्यापक भास्कर घुगे,उपक्रमशील शिक्षक भगवान तांबेकर,इतर शिक्षक, शालेय समितीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
यापूर्वीही रेवगडे यांनी शाळेला व्हाईट बोर्ड भेट देऊन शैक्षणिक कार्याला मोलाचे सहकार्य केले होते.
