दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर: येथील जि.ई.एस. एज्युकेशन ग्रुपच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,मुख्याध्यापीक आशाताई पुंगळे यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुख्मिणींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

टाळ-मृदंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकरी दिंडीला प्रारंभ झाला.विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात भगवे ध्वज, तुळशीची रोपे आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमा घेऊन गावातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध दिंडी काढली. ज्ञानोबा-तुकाराम,पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,जय जय राम कृष्ण हरी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक दत्तू ठोंबरे,विष्णू मिसाळ, दिपक डवले,गणेश मोरे,सुरेश कासारे, सिध्दार्थ रगडे, सुधीर कातखडे,किशोर पवार,बालाजी शितोळे,शुभम इंगळे, अजय जाधव,कृष्णा बनकर,कुणाल शिंदे,मीनाक्षी राऊत, वैशाली गिरी ,मीरा गोरे ,वंदना थोटे, उषा जाधव, माधवी माने, नयना पिंपळे ,अनिता उगले,स्वाती दानवे, अनिता गायकवाड, श्वेता मिस, निता डवले, रिना जाधव,स्वाती शेळके तसेच शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर,सतिष वराडे, बाबासाहेब जाधव, कार्तिक पुंगळे , पालक आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. शिक्षक दिपक डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!