दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर : येथील डायनामिक इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मामा खरात, जिल्हा सहकार बोर्ड संचालिका जिजाबाई खरात,छत्रपती संभाजीनगर येथील एपीआय सुधाकर मिसाळ, प्राचार्य भास्कर पडोळ आदी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

वारकरी संस्कृतीची ओळख आणि भक्ती, संस्कार व परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेऊन पारंपरिक वेश परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष केला. शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी केलेले दिंडी रिंगण  कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

या कार्यक्रमासाठी शिक्षक लक्ष्मण राजहंस, सचिन आठवले, नारायण नवले, समाधान नागवे, कैलास गडवे, विजय जाधव, निवृत्ती धसाळ,आश्विनी पिंपळे,कल्पना ठोंबरे,पूजा पुंगळे, देवयानी क्षीरसागर,पूजा गायकवाड, शितल इंगळे,भाग्यश्री वाघचौरे, कविता मिसाळ, रवीना कव्हाळे, पूजा कव्हाळे, दादाराव काकडे, विकास घोरपडे व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!