दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर : येथील डायनामिक इंग्लिश स्कूल,खरात मामा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात १ ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन सचिव गणेश खरात, प्राचार्य भास्कर पडोळ यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिक्षक कैलास गडवे यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अश्विनी पिंपरे,कल्पना ठोंबरे,पूजा पुंगळे, देवयानी क्षीरसागर, पूजा गायकवाड,शीतल इंगळे, भाग्यश्री वाघचौरे, रवीना कव्हाळे, पूजा कव्हाळे, कविता मिसाळ, लक्ष्मण राजहंस,सचिन आठवले, समाधान नागवे,नारायण नवले, विजय जाधव,निवृत्ती धसाळ,दादाराव काकडे,विकास घोरपडे,जनार्धन रायमल यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
