दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर: येथील जी.ई.एस. एज्युकेशनल ग्रुपमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, मुख्याध्यापिका आशाताई पुंगळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

शिक्षक दिपक डवले मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या शिकवणीतून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, बंधुभाव या मूल्यांची जोपासना करावी. तसेच या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्याविषयी मनोगतं व्यक्त केली.

या कार्यक्रमास दत्तू ठोंबरे, विष्णू मिसाळ, दिपक डवले, गणेश मोरे, सुरेश कासारे, सिध्दार्थ रगडे, सुधीर कातखडे, किशोर पवार, बालाजी शितोळे, शुभम इंगळे, कृष्णा शितोळे, अजय जाधव, कुणाल शिंदे, सुनील लष्करे, मीनाक्षी राऊत, वैशाली गिरी, मीरा गोरे, वंदना थोटे, रिना जाधव, उषा जाधव, माधवी माने, नयना पिंपळे, अनिता उगले, स्वाती दानवे, अनिता गायकवाड, श्वेता मिस, निता डवले, समीक्षा मराठे, शिल्पा रगडे, स्वाती शेळके तसेच शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी कैलास बावस्कर, सतिष वराडे, बाबासाहेब जाधव, कार्तिक पुंगळे ईत्यादींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!