दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर: येथून जवळ असलेल्या कोठा दाभाडी येथील ग्रामपंचायत सदस्य राधाकिसन शेषराव निलक यांच्या संकल्पनेतून गावातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षास जूनमध्ये सुरवात झाली.शासनाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके वाटण्यात आले.परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक चनचणीमुळे दप्तर विकत घेता आले नाही.

ही बाब लक्षात घेऊन कोठा दाभाडे येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन निलक यांनी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटण्याचा उपक्रम हाती घेतला.विद्यार्थ्यांना दप्तर मिळाल्याचा आनंद त्यांच्या  चेहऱ्यावर दिसून आला.

निलक यांच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला निश्चितच बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.त्याबद्दल ग्रामस्थ,शिक्षक आणि पालकांनी निलक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!