दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: भोकरदन येथील मोरेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च (डी. फार्मसी व बी. फार्मसी) या महाविद्यालयात (ता.१५ ऑगस्ट) रोजी ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी मोरेश्वर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा भोकरदन मतदार संघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री व मोरेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार संतोष पाटील दानवे,माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य,प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
