​श्रीक्षेत्र राजूर:
भोकरदन तहसील कार्यालयांतर्गत राजूर महसूल मंडळात ७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला सुलभतेने कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रे देणे हा या शिबिराचा उद्देश होता. परंतु राजूर मंडळातील १४ गावांमधून फक्त तीनच अर्ज प्राप्त झाल्याने शिबिर यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा शिबिराचे आयोजन करून प्रमाणपत्रासह वैधतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी उपविभागीय अधिकारी कार्तिक पानिग्रही यांच्याकडे करण्यात आली.​याशिबिराला मंडळाधिकारी आर.पी. कांबळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे, माजी सरपंच रामदास तळेकर,सरपंच नवनाथ फुके,श्रीरामपंच पुंगळे, भगवान नागवे,खरात मामा, संचित पुंगळे,उमेश पुंगळे,दत्ता डवले,विलास दानवे,वाघ सर,कृष्णा सहाने, भगवान सुद्रिक,ग्राम महसूल अधिकारी विजय गरड, मवाळ, मनभरे, जैन, कोल्हे, म्हस्के, मेहत्रे, देशमाने, खैरे, काळे, खांडेभराड यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया


प्रशासनाच्या वतीने मंडळ निहाय कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा. काही समस्या असतील तर त्याचे निरसन केली जाईल. प्रशासन सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.(कार्तिक पानिग्रही, उपविभागीय अधिकारी, भोकरदन)

प्रतिक्रियाशासनाने गावनिहाय वंशावळी व पुरावे उपलब्ध करून द्यावी. कागदपत्रां अभावी नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास होत आहे. प्रशासनाने समाजाला झुलवण्याचे काम करू नये. (भाऊसाहेब भुजंग, सरपंच राजूर)

​प्रतिक्रियाजिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने भोकरदन तालुक्यातील हैदराबाद गॅझेटनुसार दिलेल्या प्रमाणपत्रांची व पुराव्यांची माहिती मराठा समाजाला उपलब्ध करून द्यावी. (रामदास तळेकर, माजी सरपंच, चांदई एक्को)

प्रतिक्रिया
​राजूर मंडळातील १४ गावांमधून फक्त तीनच अर्ज प्राप्त झाले आहेत.शिबिर यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासनाने दुबार शिबीराचे आयोजन करावे.(उमेश पुंगळे, मराठा सेवक ,राजूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!