दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर : विपरीत परिस्थितीतही खचून न जाता आपले उत्तम आरोग्य,मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक गरजांच्या पूर्ततेसाठी विधवा महिलांनी व्यवसायभिमुख कौशल्य अवगत करून आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन आमदार नारायण कुचे यांनी केले.

राजूर येथे रोटरी क्लब ऑफ पुना व तेजस जनविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील विधवा महिला उद्योजकता प्रशिक्षण, पुनर्वसन प्रकल्पांतर्गत शिलाई मशीन व पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ पूनाचे झरीर दादाचंजी,माजी जि.प. सदस्य रामेश्वर सोनवणे, सरपंच भाऊसाहेब भुजंग,उपसरपंच संतोष मगरे, माजी सरपंच मुन्ना शेखवत, ग्रामपंचायत सदस्य राहुल दरक, प्रा. बाळासाहेब बोराडे, तेजस संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे, लक्ष्मण अंबिलवादे,अश्विनी आराधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आर्टिस्ट्री संस्थेच्या वीणा गोखले आणि रोटरी क्लबचे झरीर दादाचंजी यांच्या विशेष सहकार्यातून विधवा, निराधार व गरजू महिलांना शिलाई मशीन व पिठाच्या गिरण्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष शिवाजी तायडे यांनी केले, तर आभार वैशाली अंबिलवादे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता मगरे, उर्मिला फरकाडे, तेजल टेपले, उषा तायडे,ज्योती मगरे,ज्योती तायडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विधवा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रतिक्रिया
“विधवा महिलांनी केवळ मदतीची अपेक्षा न ठेवता शिवणकला,पिठाची गिरणी आणि मसाले उद्योग,बचत गट यां व्यवसायांच्या माध्यमातून स्वतःची प्रगती केल्यास आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व आत्मनिर्भर होऊ शकतात.”
(रामेश्वर सोनुने, माजी जि.प.सदस्य)
प्रतिक्रिया

“विधवा महिलांनी हताश न होता कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यवसायाची कास धरून योग्य बचत व आर्थिक नियोजनाच्या जोरावर स्वावलंबी बनले पाहिजे.” (भाऊसाहेब भुजंग, सरपंच, राजूर)
प्रतिक्रिया
“विधवा महिलांना छोटछोट्या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हाच या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.”
(शिवाजी तायडे, अध्यक्ष तेजस संस्था)
प्रतिक्रिया

“याउपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विधवा महिला एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे विधवा महिला उद्योजकता प्रशिक्षण,पुनर्वसन प्रकल्पास सकारात्मक दिशा मिळाली आहे.” (झरीर दादाचंजी,रोटरी क्लब, पुना)
