दर्पण सह्याद्री न्यूज
छत्रपती संभाजीनगर : येथील श्री हरिहर न्यूरोथेरपी वेलनेस सेंटर (Shri Harihar Neurotherapy Wellness Centre) च्या माध्यमातून मागील २० वर्षापासून विना औषधी रोगोपचार पध्दतीचा प्रचार व प्रसार ॲक्युपंक्चर व न्यूरोथेरपी करीत असलेले व अनेक रुग्णांना पिडा मुक्त करीत असलेले डॉ.विष्णु पुरी यांना २०२६ चा महा-ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.दिनांक १९ जुलै २०२६ रविवार रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदच्या सभागृहात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ नितीन राजे पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल डॉ. पुरी यांचे अभिनंदन केले जात आहे.
