दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर:आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वितरण करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून राजुर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने २५ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राजूरच्या सरपंच प्रतिभा भुजंग यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वसामान्य माणसांना मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो म्हणून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात.म्हणून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कार्ड काढून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी.एम.पाटील,
वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू राठोड,डॉ.सतीश कावळे, डॉ,सोनटक्के,इन्चार्ज सिस्टर प्रेरणा निर्मल,डाटा ऑपरेटर आकाश कोलते,रुग्णालयीन कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
