दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:येथे गणपत दादा इंग्लिश स्कूल आणिआर्ट ऑफ लिव्हिंग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सहा दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.योग शिक्षकाने साधकांस विविध योग प्रात्यक्षिके करून दाखवत योगाचे महत्व पटवून दिले.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रारंभ झालेल्या शिबिरातून साधक आनंद अनुभूती घेत आहेत.
राजूर येथे श्री.गणपत दादा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून पुढील सहा दिवस नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रोज सकाळी पाच ते सात या वेळेत हे शिबीर चालणार आहे.योग शिबिराच्या माध्यमातून योग, ध्यान, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, खेळ, सूर्यनमस्कार यांसारख्या यौगिक क्रिया करून घेतल्या जात आहेत.
यावेळी योग शिक्षक राहुल जोशी यांनी शिबिरार्थीकडून विविध प्रात्यक्षिके करून घेतली आणि मानवी जीवनात उत्तम आरोग्यासाठी योग किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. तणावमुक्त जीवनासाठी नियमित व्यायाम व योग साधना करावी असेही जोशी म्हणाले. शिबिरात राजूर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.
शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेस्टा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,आर्ट ऑफलिव्हिंगचे स्वयंसेवक उद्धव फुंदे , प्रा.बाळासाहेब बोराड़े,शिवाजी बांदल,समाधान माळी, भगवान सुद्रिक,डॉ.सुदर्शन थोटे,डॉ.ईश्वर जटाळे,सीमा शर्मा आदी व्यक्ती परिश्रम घेतआहेत.
