दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: येथील कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवले.या स्पर्धेत इयत्ता तिसरी,पाचवी आणि सहावी शिकणारे विद्यार्थी अनुक्रमे देवांशी रुपेश बुंदेले,कायरा प्रवीण काबरा आणिआरुषी रुपेश बुंदेले या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गणितीय प्रक्रियेतील अचूकता, वेगवान गणना, मेंदूची एकाग्रता,मानसिक क्षमतांचा प्रभावीपणे वापर,सातत्यपूर्ण सराव,शिक्षक व पालकांचे मार्गदर्शनामुळे त्यांना हे यश मिळाले.

त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या संस्थापक अध्यक्ष विनायकुमार कोठारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापिका सरोज कोरे, ज्येष्ठ शिक्षिका उषा गायकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!