दर्पण सह्याद्री न्यूज:

छत्रपती संभाजीनगर:

वैद्यकीय क्षेत्रातअतिशय प्रभावी नाव असलेल्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या जिल्हाक्षपदी डॉ. अस्लम शाह यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.विष्णु पुरी यांची निवड करण्यात आली आहे.नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे एक फेब्रुवारी रोजी आयुष मेडिकल असोसिएशनचे महाअधिवेशन पार पडले.त्यामध्ये डॉ.शाह, डॉ.पुरी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

अधिवेशनात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन डॉ.नितीनराजे पाटील,अरमन डॉ.सतीश कराळे,अध्यक्ष डॉ बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठकर तसेच महाराष्ट्रातील आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, ॲक्युपंक्चर क्षेत्रातील चिकित्सक उपस्थित होते. डॉ.अस्लम शहा, डॉ. विष्णु पुरी यांची निवडीबद्दल प्रा. बाळासाहेब बोराडे, विनोद कंगले, साईनाथ औंढेकर, भरत खिल्लारे , योगेश बागुल,रवि आंबेकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!