दर्पण सह्याद्री न्यूज
जालना: ग्राहक चळवळीचे प्रणेते, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहक तिर्थ स्व.बिंदूमाधव जोशी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यरत असलेली ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य ही संस्था शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी राज्यभर ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे.
जालना जिल्ह्यात संघटनात्मक काम वाढीसाठी तालुक्यास्तरावर कार्यकारीणी गठीत करून विविध तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये बदनापूर तालुका अध्यक्षपदी सुभाष जगताप, मंठा तालुका अध्यक्षपदी राधाकिसन बोराडे,भोकरदन तालुका अध्यक्षपदी बालासाहेब बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ग्राहक पंचायतच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे जालना जिल्हा अध्यक्ष मोहन इंगळे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.दिलिप लाड, जिल्हा संघटक संजय देशपांडे, जिल्हा सचिव शिवाजी वाघ यांची उपस्थितीत होती.
