दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजूर:

अनाठायी खर्चाला फाटा देऊन समाजातील गरजूंची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने राजूर येथील माऊली वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे यांनी वडील शेनफड पुंगळे यांच्या 20 व्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनानिमित्त गरजूंना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी पुंगळे यांनी राजूर परिसरातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
यामध्ये राजूर,चिंचोली,चांदाई एक्को,चनेगाव यासारख्या अनेक गावातील गरजू व्यक्तींना ग्रामस्थ आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत किराणा किटचे वाटप करण्यात आले.याउपक्रमात अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,प्राचार्या आशाताई पुंगळे यांच्यासह आर.एच.दानवे,विष्णू गवळी,पिंपळे सर,हरिदास निकम, सतीश टोम्पे,पत्रकार दिपक घुगे यांच्यास ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!