दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
येथील जीईएस ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवाळी सणापूर्वी शाळेच्या आवारात आनंदनगरीचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
याकार्यक्रमाच्या माध्यमातून ‘मुलगी वाचवा,मुलगी शिकवा’हा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.यावेळी विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेल्या खाद्यपदार्थाचे स्टॉल शाळेच्या प्रांगणात लावण्यात आले होते.
शिक्षक आणि पालकांनी खाद्यपदार्थाची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा झाला.यावेळी विद्यार्थ्यांनी व्यवहारिक ज्ञानाचे धडे गिरवत आनंदनगरी कार्यक्रमाचा आनंद लुटला.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पुंगळे, प्राचार्या देवलीला पुंगळे,डॉ.जटाळे,विष्णू गवळी,सतीश आंबरे,आर. एच. दानवे,देशमुख,कुलदीप गिरी,परिवहन समिती सदस्य, शिक्षक,पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
