दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:येथील लोकशाहीर साहेबराव पवार यांना ए.डी.फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गोरड यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावर्षी भोकरदन तालुक्यातील राजूर येथील लोकशाहीर साहेबराव पवार यांना कलेच्या माध्यमातून अनेक विषयांवर जागृती करून प्रबोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल रुद्राणी फाउंडेशनचे भीमाशंकर आप्पा दारूवाले, राजूर अर्बन बँकेचे अध्यक्ष कैलास गबाळे,पांडुरंग पाटील इंगळे,माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे, कैलास उन्हाळे,गजानन सानप ,शिवाजी पडोळ, शाहीर जनार्दन कावले, शाहिरा उषाताई कावले,ढोलकी सम्राट संतोष वाघमारे,महालिंग आप्पा तवले, स्वप्नील दारूवाले, गणेश दारुवाले, ऍड. सुरेश खंदारे, नितीन कावले, आदींनी अभिनंदन केले.
