दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर: येथील श्री राजूरेश्वर महागणपती देवस्थानमध्ये सेवा देणारे सेवेकरींची पहिली फळी २५ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र राजूर येथून श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्याकडे रवाना झाली असून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते राजुरेश्वरांच्या पायथ्याशी नारळ फोडून देवदर्शन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.या देवदर्शन यात्रेत ९० महिला व ११ पुरुष सेवेकरींचा समावेश आहे.
श्रीक्षेत्र राजुर गणपती संस्थान येथे मराठवाड्यातील २५१ गावातील सेवेकरीं अविरत निष्काम सेवा देतात. त्यापैकी पहिल्या टप्प्यात बाभूळगाव, नळणी,बोधेगाव येथील १०० महिला सेवेकरींना आयोध्या देवदर्शनासाठी पाठवण्यात आले.पुढील काळात टप्याटप्याने सर्वंच सेवेकरींना आयोध्या दर्शनासाठी पाठवण्यात येणार असल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले.
गणपती संस्थानमार्फत अयोध्या दर्शन होणारा असल्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान सेवेकरीं अयोध्या परिसरातील विविध धार्मिक क्षेत्रांना भेटी देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन करून मंदिर परिसरात स्वच्छता सेवा देणार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सेवेकऱ्यांचा प्रवास सुकर आणि आनंदी व्हावा म्हणून शुभेच्छा दिल्या. राजूरेश्वर भगवान की जय,गणपती बाप्पा मोरया,जय श्रीरामचा जयघोष करत सेवेकऱ्यांनी अयोध्येकडे प्रस्थान केले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे,गणेश मामा साबळे,भाऊसाहेब भुजंग,गजानन नागवे,श्रीराम पुंगळे, उत्तम रावळकर,रतन ठोंबरे,आसाराम बोटूळे,शिवाजी बांदल,मन्सूब पिंपळे, हरी निकम,आर.एच.दानवे, बळीराम टेपले डॉ.जटाळे, भगवान डेरे,एकनाथ साबळे,गोरक्षनाथ जाधव,शिवाजी शेरे तसेच नळणी, बाभूळगाव व बोधेगाव येथील सेवेकरींची उपस्थिती होती.
