दर्पण सह्याद्री न्यूज

मंठा प्रतिनिधी : मंठा शहरातील बी.के. कॉर्नर व बाजार परिसरात मंठा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.
धाडीदरम्यान पोलिसांनी सुमारे ८० हजार रुपयांचे हातभट्टी दारू निर्मिती साहित्य जप्त केले. तसेच सुमारे १२०० लिटर हातभट्टी दारूचा सडवा आणि २२० लिटर आंबट व उग्र वास येणारी गावठी दारू नष्ट करण्यात आली.याप्रकरणी अविनाश भगवान गायकवाड राहणार मंठा बीके कॉर्नर इंदिरानगर विनायक नारायण इंगोले राहणार मंठा या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई  पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे, फौजदार संतोष माळगे, विठ्ठल केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी आनंद ढवळे, मंगेश चौरे, सतीश आमटे, शिवानंद काळुसे, संतोष बनकर, मुंजा कोलगणे, जगन्नाथ सुक्रे आणि महिला पोलीस कर्मचारी सुला मरकड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.मंठा पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!