दर्पण सह्याद्री न्यूज / श्रीक्षेत्र राजुर

भोकरदन तालुक्यातील राजुरी येथे ग्राम संसद कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपसरपंच जिजाबाई मगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.     याप्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीरामपंच पुंगळे,संतुकराव पुंगळे,ग्रामपंचायत सदस्य नामदेव पुंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.याप्रसंगी कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात आला. तंबाखूजन्य व अमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली.हरघर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम,स्वातंत्र्य दिनाचा विजय असो,स्वातंत्र्य दिन चिरायू होवो अशा घोषणा दिल्या.यावेळी सरपंच प्रतिभाताई भुजंग,उपसरपंच जिजाबाई मगरे,सुशीलाबाई भुजंग,रेखाताई डवले, जिजाबाई करपे, गीताताई पुंगळे,सुनंदाताई पवार, तुळसाबाई मोरे,सरलाताई पुंगळे यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.तसेच माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे,माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे, रामेश्वर सोनवणे ,ग्राम पंचायत सदस्य पंढरीनाथ करपे, मुसासेठ सौदागर, संतोष मगरे,आप्पासाहेब पुंगळे, परमेश्वर पुंगळे,नामदेव पुंगळे,निवृत्ती पुंगळे,सुरेश पवार,गुलाबराव मगरे यांची उपस्थिती होती.तसेच श्रीरामपंच पुंगळे,गणेशराव साबळे,मुकेश अग्रवाल, आदमाणे सर,भीमाशंकर आप्पा दारूवाले,संतोष पुंगळे, संदीप मगरे, डॉ.मुलतानी पत्रकार ज्ञानेश्वर पुंगळे, शिवाजी बोर्डे, विठ्ठल पुंगळे,बबन मगरे,लक्ष्मण कांबळे, मिलिंद मगरे, साहेबराव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश सोनवणे,भगवान सुद्रिक, गणेश पुंगळे,गजानन डवले, सोमीनाथ पुंगळे, विजय पुंगळे, अंबादास लोखंडे, लक्ष्मीबाई पवार,पंडित मराठे,नारायण पवार,विष्णू वाकेकर,रामेश्वर पडोळ, सिकंदर शेख,विठ्ठलराव सोनवणे हेंही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!