दर्पण सह्याद्री न्यूजश्रीक्षेत्र राजुर

देशभरात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भोकरदन तालुक्यातील राजुर येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतही भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत राजुर पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कॉन्स्टेबल राहुल भागिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे,सकाळचे पत्रकार ज्ञानेश्वर पुंगळे, प्रा.बाळासाहेब बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.ध्वजारोहण झाल्यानंतर मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगान,महाराष्ट्र गीत ,आणि पसायदान घेण्यात आले.तसेच कार्यक्रमादरम्यान प्लास्टिक मुक्त गाव आणि शाळा परिसर करण्याचा संकल्प करण्यात आला तसेच अमली पदार्थ विरोधी शपथ विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी जीवनात व्यसनापासून दूर राहण्याचा दृढ निश्चय केला.शाळेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते विद्यार्थिनींनी ध्वजस्तंभ आणि महापुरुषांच्या प्रतिमा समोर आकर्षक अशा रांगोळी काढल्या होत्या.विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर विविध शारीरिक कवयतिचे प्रात्यक्षिके करून दाखविल.श्रीराजुरेश्वर गणपती संस्थान मध्ये विनामूल्य सेवा देणाऱ्या श्रीच्या सेवेकरी महिलांनी मंदिर परिसरा बरोबरच शाळा परिसर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.त्याबद्दल शालेय समितीच्या अध्यक्ष शितलताई दारुवाले यांनी महिला सेवेकरींचा शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सेवेकरी महिलांनी शाळेसाठी सफाई साहित्य भेट म्हणून दिले.

विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव,राजगुरू, चंद्रशेखर आझाद,महात्मा गांधी,झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारतमाता यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.गावातून जनजागृती रॅली व प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात ‘स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ ‘भारत माता की जय’,’वंदे मातरम ‘स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’ यासारख्या देशभक्तीपर घोषणा देत भारत मातेचा जयजयकार केला जात होता.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त शासनाच्या वतीने एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातही राजुर जिल्हा परिषद शाळेने मोठ्याने हिरीरीने सहभाग नोंदवून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. एकंदरीत राजुर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन विविध सांस्कृतिक व देशभक्तीवर कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात पार पडला.याकार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे, माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग,ग्रामविकास अधिकारी प्रमोद पुंगळे,ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ थोटे,रुद्राणी फाउंडेशनचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारूवाले,माजी जिल्हा परिषद सदस्य रामेश्वर सोनवणे,उपसरपंच संतोष मगरे,पोलीस कॉन्स्टेबल राहुल भागिले, ग्रामपंचायत सदस्य विनोद डवले, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते श्रीरामपंच पुंगळे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पुंगळे,परमेश्वर पुंगळे , सुरेश पवार,राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष पुंगळे,गणेशआप्पा दारूवाले, पत्रकार साहेबराव पवार,शालेय समितीचे अध्यक्ष शितलताई दारूवाले,केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, मुख्याध्यापक के.टी.इंगळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!