दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर: येथील पडोळ हॉस्पिटल,शिवकृपा लॅबोरेटरी आणि स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत २० युवकांनी रक्तदान केले.यावेळी पडोळ हॉस्पिटल आणि स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या वतीने रक्तदात्यांस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिमांचे पूजनकरून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.यावेळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार सुधाकर दानवे,मेस्टा अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, पत्रकार राम पारवे ,प्रा.बाळासाहेब बोराडे,डॉ.संदीप पडोळ, डॉ.सुरेखा पडोळ,दत्तू शिंदे,स्वामी समर्थ रक्तपेढीचे अमोल शिंदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने जिल्ह्यात सर्वत्रच रक्ताचा तुटवडा भासत आहे.रक्ताची मागणी वाढली परंतु पुरवठा त्याप्रमाणात होत नाही.रुग्णांच्या तुलनेत रक्त दात्यांचे प्रमाण कमी झाल्याने अनेक वेळा इच्छा असूनही गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करता येत नाही. त्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता असते.
ही उणीव भरून काढण्यासाठी जालना येथील स्वामी समर्थ रक्तपेढीने डॉ.संदीप पडोळ,डॉ.सुरेखा पडोळ यांना आपल्या रुग्णालयात रकदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले.त्यास डॉ.पडोळ यांनी तत्परता दाखवत राजूर येथील आपल्या रुग्णालयात तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले.त्यास रक्तदात्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अगदी कमी कालावधीत वीस युवकांनी रक्तदान केले.त्यामुळे गरजू रुग्णांपर्यंत रक्त पोहचविणे सहज शक्य झाले.हाकेला साद घालत तातडीने रक्तदान केल्याबद्दल डॉ.पडोळ आणि स्वामी समर्थ रक्तपेढीने रक्तदात्यांचे आभार मानले.
या शिबिरात डॉ.संदीप पडोळ,डॉ.सुरेखा पडोळ,रमेश नागवे,महादू दानवे,साबीर खान,शरद थोटे,दीपक घुगे, कैलास नागवे,प्रज्वल हजारे,विठ्ठल मुटकुळे,गणेश पंडित, विजय कोरडे,शुभम इंगळे, योगेश निहाळ,रामराव मुळेकर, विठ्ठल कुदार,विठ्ठल आवताडे, दत्तू शिंदे,संदीप माठे,गणेश पंडित ,पवन घोलप,आदी जणांनी रक्तदान करून सहकार्य केले.आयोजन समितीच्या वतीने रक्तदात्यास सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.पडोळ हॉस्पिटलचे कर्मचारी,स्वामी समर्थ रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अमोल शिंदे,आणि शिवकृपा लॅबोरेटरीचे दत्तू शिंदे यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
