दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजूर:भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे रविवार रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय,डॉ.पवार हॉस्पिटल आणि राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात राजूरसह परिसरातील विविध शारीरिक व्याधीग्रस्त रुग्णांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
या आरोग्य शिबिरात डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी आप्पा कुलकर्णी, डॉ. मुकेश परमार, डॉ. वर्षा धोंडे,डॉ.सिद्धार्थ,डॉ.शीतल बाविस्कर,श्री.विकास होलाप, श्री.प्रवीण वाणी,डॉ. कैलास चौधरी,डॉ. योगेश मिसाळ, राजमुद्रा फाऊंडेश अध्यक्ष प्रा.बाळासाहेब बोराडे,पवार हॉस्पिटल संचालक डॉ.भाऊसाहेब पवार,आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरातुन अनेक रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला असून त्यामध्ये मेडीसिन ५०,सर्जरी २२,नेत्र विभाग ५८, बालरुग्ण १०, रेफर रुग्ण ३०,आरबीएस शुगर ४० अशा एकूण २१० रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून निदान करण्यात आले.
यामध्ये मधुमेह,रक्तदाब,थायरॉईड,श्वसन विकार,अपेंडिक्स, हर्निया,मुळव्याध,मुतखडा,बालकांच्या शारीरिक,बौद्धिक, मानसिक वाढीबद्दलच्या समस्या,नेत्ररोग तपासणी,त्वचा रोग, यासारख्या समस्यांग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी करून औषधीचे मोफत वितरण करण्यात आले.
शिबिर यशस्वीतेसाठी जनार्दन पवार, निवृत्ती पवार,दत्ता शिंदे,ऋषिकेश निहाळ, दत्ता घायाळ, कृष्णा पवार,सुरेश निहाळ आदी जणांनी परिश्रम घेतले.
