दर्पण सह्याद्री न्यूज
जालना:येथे कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेचे संचालक विनयकुमार कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. प्राचार्य अरुणकुमार पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा फुले यांच्या शिक्षणप्रेमी व समाजसुधारक कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
निशांत लालझरे यांनी भाषणातून महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षण, सामाजिक समता व अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमात विद्यार्थिनी आरुषी बुंदीले, हर्षना राठी,कविता चौधरी यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन रुपाली गायकवाड यांनी केले.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
