दर्पण सह्याद्री न्यूज/श्रीक्षेत्र राजूर
येथील माऊली बी.ए. प्रशासकीय सेवा वरिष्ठ महाविद्यालय स्वातंत्र्य दीन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इतिहास,संस्कृती, शिक्षण आणि देशभक्तीवर आधारीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमाचे ध्वजारोहण सुधाकर दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांच्या शौर्याची आठवण करून दिली. कार्यक्रमास संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे,प्राचार्या आशाताई पुंगळे ,प्राध्यापक,ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
