दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजूर:
फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत राजुर येथील मोरेश्वर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अविराज बालासाहेब बावणे याने ९१. ८० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन करून विशेष प्रावीण्यसह उत्तीर्ण झाला आहे.

त्याच्या यशाबद्दल मार्गदर्शक सुनील दानवे, मुख्याध्यापक सुरेश कासारे, शाळेतील शिक्षकवृंद तसेच वडील बालासाहेब बावणे,आई शारदा बावणे, नातेवाईक किशोर थोटे व मित्रांनी अविराज बावणे याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
