दर्पण सह्याद्री न्यूज
श्रीक्षेत्र राजुर:
भोकरदन तालुक्यातील राजुर येथील लक्ष्मीबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या डायनामिक इंग्लिश स्कूल व खरात मामा विद्यालयाच्या वतीने यावर्षी ऊर्जा या थीमच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 30 मार्च रोजी शाळेच्या आवारात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.भोकरदनचे आमदार संतोष पाटील दानवे,मोरेश्वर शिक्षण संस्थेच्या सचिव निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी विदयार्थ्यांनी भारतीय संस्कृती, वेशभूषा, लोकगीते, देशभक्तीपर गीते,लावणी,नाटक,चित्रपट गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर पर्यावरण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा, स्त्रीभ्रूणहत्या, शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण, राष्ट्रीय एकात्मता यासारख्या अनेक विषयावर कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकुन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. विविध नृत्यांवर चिमुकली मुलं थिरकली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

याकार्यक्रमास गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधाकरराव पाटील दानवे, सरपंच प्रतिभाताई भुजंग,उपसरपंच संतोष मगरे, माजी उपसभापती गजानन नागवे,जिल्हा परिषद सदस्य कैलास पुंगळे,माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सारंगधर बोडखे, गजानन बँक अध्यक्ष सतीश रोकडे, पोलीस निरीक्षक किरण बिडवे,सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे,गटविकास अधिकारी जी.एस.सुरडकर, गट शिक्षणाधिकारी डी.एस.शहागडकर, केंद्रप्रमुख रमेश पुंगळे, जेष्ठ समाजसेवक अरविंद थोटे, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरामपंच पुंगळे,शालेय समितीचे अध्यक्ष भीमाशंकर दारुवाले, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सागर बारोटे,ज्येष्ठ पत्रकार शामराव पुंगळे,भगवानराव नागवे,संस्था अध्यक्ष बाबुराव मामा खरात, सचिव गणेश खरात, संचालक विजय डोंगरे,काकडे, राष्ट्रवादी कांग्रेस तालुकाध्यक्ष संतोष पुंगळे,लहुजी सेनेचे प्रमोद कांबळे, काकडे साहेब यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन भास्कर पडोळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
