दर्पण सह्याद्री न्यूज

जालना: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जालना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जालना जिल्हा परिषदेत नव्याने रूजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारीया
यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना कनवारीया म्हणाले की मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पूर्ण करून आल्याने मला ग्रामीण भागातील शैक्षणिक समस्यांची जाणीव आहे.शिक्षक संघटना आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून विकासात्मक धोरण राबविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस शांतिलाल गोरे यांनी प्रास्ताविकात बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची कार्यपध्दती राज्य,संघटनेची रूपरेषा याविषयी माहिती दिली.

तसेच या अगोदरच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती पी.एम. मिन्नू यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद शाळांना ग्रामपंचायतकडून निधीच्या माध्यमातून विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यासाठी शाळेला निधी,भौतिक सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे असून जिल्हा स्तरावर शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे आवश्यक असल्याचे शिक्षक संघाने म्हटले आहे.उपशिक्षणाधिकारी संजय कायदे यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालके, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष आण्णा इंगळे, अर्जुन पवार,वसंता शेवाळे, अरुण कदम, बालाजी परतवाड ,राजेंद्र निहाळ,वसंता देशमुख,प्रकाश मानसुरे,गणेश उगले, बंडू अहिरवार,भरत जाधव,संतोष जोशी,किशोर महाजन, कैलास धोत्रे , उमेश पडूळ ,कल्याण गव्हाणे ,अनंता जंजाळ, सचिन अक्कर,लिंबाजी पडोळ,विजय लहाने,नागवे, धडे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.आभार आण्णा इंगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!