दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
जालना: भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुर महागणपती मंदिर हे धार्मिक स्थळ म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून मंदिरास सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.दरवर्षी लाखो भाविक राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात.नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने श्रीक्षेत्र राजूर मंदिरास पर्यटन स्थळाचा ‘अ’दर्जा बहाल केला आहे.केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
यानिमित्त आमदार संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते राजुरेश्वरांची पूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून शासन निर्णयाचे स्वागत केले.
राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र राजुर पर्यटन स्थळास ‘अ ‘दर्जा प्राप्त झाला असून त्यामुळे मंदिर परिसराचा विकास होऊन पर्यटनास चालना मिळणार आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना नागरिक व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सुधाकरराव दानवे,श्रीरामपंच पुंगळे,गणेशराव साबळे,प्रशांत दानवे,भाऊसाहेब भुजंग, भगवानराव नागवे, संतोष मगरे,गजानन नागवे,रामलाल चव्हाण,जगनराव पवार, पंढरीनाथ करपे, आप्पासाहेब साखरे,रामदास तळेकर,रतन ठोंबरे,सारंगधर बोडखे, रामेश्वर कढवणे,सुखानंद पारवे, ज्ञानेश्वर पुंगळे,राहुल दरख, रामेश्वर पडोळ,नवनाथ फुके,
आप्पासाहेब पुंगळे,परमेश्वर पुंगळे,रावसाहेब ठोंबरे,मुन्नाशेठ शेखावत,रामचंद्र नागवे, शरद थोटे,तुळशीराम गायकवाड, मोहिनीराज मापारी, रामदास तळेकर,हरिभाऊ काळे, लक्ष्मण कांबळे,यासह कार्येकर्ते व गणपती संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
