दर्पण सह्याद्री न्यूज

प्रा.बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजुर: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  23 एप्रिल रोजी श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी चार वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमास जास्तीत हिंदू बांधव व माता भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.23 मार्च रोजी बलोपासक रामभक्त श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त राजूर येथील हनुमान मंदिरात सकाळपासूनच  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीहनुमानाच्या मूर्तीचा जलाभिषेक ,विधिवत पूजा, सामूहिक हनुमान चालीसा पठण,हवन-पूजा,महाआरती, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.सायंकाळी चार वाजता श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा निघणार आहे. राजुर येथील हनुमान मंदिरातून शोभा यात्रेस प्रारंभ होणार असून बस स्थानक मार्गे शहराच्या मुख्य रस्त्याने जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राजुरेश्वराच्या पायथ्याशी या शोभायात्रेचा समारोप होणार आहे.

 

भारतीय वेशभूषा परिधान करून वारकरी संस्थेतील विद्यार्थी आणि भजनी मंडळी या शोभायात्रेत सहभागी होणार असून महाबली हनुमान हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक असणार आहे.तरी सर्व हिंदू बांधव ,माता भगिनींनी  या उत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!