दर्पण सह्याद्री न्यूज
प्रा.बाळासाहेब बोराडे
श्रीक्षेत्र राजुर: येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवशी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांनी कीर्तनरुपी सेवेचे पुष्प गुंफले. त्यांनी कीर्तन चांग किर्तन चांग ।होय अंग हरी रूप।।या अभंगावर गोड असे निरूपण केले. ह.भ.प.बोधले महाराज यांनी कीर्तनातून वेद, पुराणशास्त्र, संत वाङ्मय इत्यादीचे पुरावे देत श्रोत्यांचे प्रबोधन केले.समाजांना वेगवेगळ्या विषयाचे संघटन, ज्ञान,अध्यात्म, समाज आणि संस्कृती यांना जीवनामध्ये मोलाचे स्थान आहे. अखंड हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून हजारो भक्त गणरायाच्या दरबारात हरिनामाशी एकरूप झाला आहे.
कीर्तन ही जीवनामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त करून देणारी परंपरा आहे. या परंपरेची जोपासना राजूरकरगेल्या 57 वर्षापासून करत आहे. ज्ञानोबांचीची ज्ञानेश्वरी,जगद्गुरु तुकोबांची गाथा,नाथांचे भागवत हे वारकरी संप्रदायांचे तीन बलस्थाने आहोत.संत वाङ्मय प्रत्येक कुटुंबात पोहोचले पाहिजे. कारण ते जीवनामध्ये योग्य रस्ता दाखवण्याचे कार्य करते. छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु तुकोबाराया यांच्या जीवनचरित्रातून भक्तीचा आणि शक्तीचा एकत्रित संगम दिसून येतो.तरुणांनी निर्व्यसनी जीवनाचा अंगीकार करून अध्यात्माची कास धरावी. थोर संत व राष्ट्र पुरुषांचे आचार, विचार यांचा अंगिकार करावा असेही जयवंत महाराज बोधले म्हणाले. सप्ताह संयोजन समितीच्या वतीने विष्णु महाराज सास्ते यांनी ह भ प जयवंत महाराज बोधले यांचे स्वागत केले.
