दर्पण सह्याद्री न्यूज

श्रीक्षेत्र राजुर :राजूर पासून जवळ असलेल्या चिखली फाटा येथील स्टार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आज रक्षाबंधन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन कार्यक्रमातून समाजाला आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. येथील मुलींनी आपल्या सर्व लाडक्या भावांना राख्या बांधल्या .परंतु त्याच बरोबर आपल्या मनातील स्वप्नाला बळ येऊन स्वतःमध्ये स्वसंरक्षणाचे सामर्थ्य निर्माण व्हावे म्हणून एक राखी बांधून स्वालंबनाचा संकल्प करण्यात आला.

आपला भाऊ संकटकाळी आपली मदत करेलच परंतु सुसंरक्षणासाठी बांधलेली राखी आपल्याला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची हिंमत देईल.असे कार्यक्रमातून दाखवून दिले.

रक्षाबंधन निमित्त सकाळी लहान मुलांचे राखी मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. तर दुपारी मोठ्या मुलांची वैचारिक निबंध स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष संदीप राठोड, उपाध्यक्ष विक्रम राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.हा कार्यक्रम किरड सर, अनिल सर, मापारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या शिक्षिका स्नेहा लोणकर,पूजा हळदे, सपना पवार,योगिता कांबळे, रुपाली पिसाळ,आगळे मॅडम, फुके मॅडम,जायभाये मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली.निबंध स्पर्धेसाठी सचिन राठोड ,शुभम सर, नाईक सर, ठोबरे सर,शिंदे सर यांनी मेहनत घेतली. शेवटी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!